काल संसदेत झोपलेले राहुल गांधी आज पीडितांच्या भेटीला

गुजरातमधल्या उनामध्ये मारहाणीत जखमी झालेल्यांची भेट घेण्यासाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधीं उनामध्ये दाखल झाले. यावेळी राहुल गांधींनी पीडित दलीत कुटुंबियांची भेट घेतली. 

Updated: Jul 21, 2016, 05:38 PM IST
काल संसदेत झोपलेले राहुल गांधी आज पीडितांच्या भेटीला

उना : गुजरातमधल्या उनामध्ये मारहाणीत जखमी झालेल्यांची भेट घेण्यासाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधीं उनामध्ये दाखल झाले. यावेळी राहुल गांधींनी पीडित दलीत कुटुंबियांची भेट घेतली. 

काही दिवसांपूर्वीच ऊनामध्ये या दलित कुटुंबातल्या तरूणांना गाईची त्वचा घेऊन जात असताना सापडल्यानं गावतल्याच काही तरूणांनी बेदम मारहाण केली. त्यात हे सर्व जण जखमी झाले. या मारहणीचा व्हि़डिओ व्हायरल झाल्यावर याप्रकरणाचे पडसाद काल लोकसभेतही उमटले. 

याच मुद्द्यावरून काल दिवसभर काँग्रेसनं लोकसभेत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या चर्चेदरम्यान राहुल गांधी लोकसभेमध्ये झोपल्याचा आरोपही झाला होता. काँग्रेसनं मात्र हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत.