राहुल गांधींकडून पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारण्याचे संकेत

काँग्रेस पक्षच 2014 मध्ये सत्तेवर येणार असा विश्वास काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी व्यक्त केलाय. पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारण्यास आपण तयार असल्याचे संकेतही राहुल गांधींनी यावेळी दिले.

Updated: Jan 14, 2014, 08:33 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
काँग्रेस पक्षच 2014 मध्ये सत्तेवर येणार असा विश्वास काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी व्यक्त केलाय. पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारण्यास आपण तयार असल्याचे संकेतही राहुल गांधींनी यावेळी दिले.
काँग्रेस पक्ष भविष्यात जी जबाबदारी आपल्यावर सोपवेल ती पूर्ण निष्ठेनं पार पाडू असं त्यांनी स्पष्ट केलंय. तसंच प्रियंका गांधी काँग्रेस पक्षाची सक्रिय कार्यकर्ता असून 2014 च्या निवडणुकीत प्रियंका गांधींची निवडणूक लढवण्यात प्रत्यक्ष भूमिका नसेल असंही राहुल गांधींनी स्पष्ट केलंय. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी हे स्पष्ट केलंय.
मनमोहन सिंह
काहीच दिवसांपूर्वी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी यापुढची टर्म नको असल्याचं सांगत, राहुल गांधी यांना मोठा जनाधार असल्याचं म्हटलं होतं. एकाअर्थी पुढचे पीएमपदाचे राहुल हेच उमेदवार असतील हेच त्यांनी स्पष्ट केले होते.
शरद पवार
जनतेला खंबीर राज्यकर्ते हवे आहेत, असा चिमटा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी काँग्रेस नेतृत्वाला उद्देशून लगावला होता. चार राज्यांतल्या विधानसभा निवडणुकांनंतर पवार काय म्हणाले होते.
राहुल गांधी
राहुल गांधी गेल्या सप्टेंबरमध्ये पुण्यात आले होते. त्यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आपली ताकद इतकी वाढवा, की कुणाच्या मदतीची गरज पडू नये, असं सांगत राष्ट्रवादीला एक प्रकारे आव्हान दिलं होतं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.