नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे पुरावे माझ्याकडे : राहुल गांधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे पुरावे माझ्याकडे आहेत, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. मोदींच्या भ्रष्टाचारावर मला लोकसभेत बोलायचं आहे. पण बोलूच दिलं जात नाही, असे राहुल गांधी म्हणालेत.

Updated: Dec 14, 2016, 04:38 PM IST
नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे पुरावे माझ्याकडे : राहुल गांधी title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे पुरावे माझ्याकडे आहेत, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. मोदींच्या भ्रष्टाचारावर मला लोकसभेत बोलायचं आहे. पण बोलूच दिलं जात नाही, असे राहुल गांधी म्हणालेत.

नोटाबंदीवरील चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरतात त्यामुळे ते लोकसभेत चर्चा करत नसल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केलाय. तसंच मोदींनी केलेल्या भ्रष्टाचाराची माहिती असल्यामुळं आपल्याला संसदेत बोलू दिलं जात नसल्याचं त्यांनी संसद भवनाच्या आवारात पत्रकारांशी बोलताना दावा केलाय.

मोदींविरोधात माझ्याकडे पुरावे आहेत. पण मला बोलू दिले जात नाही. मी बोलले तर त्यांचा फुगा फुटेल हे त्यांना कळून चुकलं आहे. ते घाबरलेत,' असा दावाही राहुल गांधी यांनी केला. नोटबदीबद्दल पंतप्रधानांनी देशाला उत्तर दिलं पाहिजे. ते जबाबदारीपासून पळून जाऊ शकत नाहीत, असे राहुल गांधी म्हणालेत.