फॅशनेबल फ्रान्सच्या निमोनीला साध्या-सोप्या भारताची भुरळ

निमोनी... सारं काही सोडून ती भारतात आली... का आली ती भारतात? असं काय होतं भारतात ज्याच्या ओढीनं तिला इथे यावं लागलं? काय करायचंय नेमकं तिला भविष्यात? का तिला स्थायिक व्हायचंय भारतात?

Updated: Dec 14, 2016, 01:52 PM IST
फॅशनेबल फ्रान्सच्या निमोनीला साध्या-सोप्या भारताची भुरळ title=

अहमदाबाद : निमोनी... सारं काही सोडून ती भारतात आली... का आली ती भारतात? असं काय होतं भारतात ज्याच्या ओढीनं तिला इथे यावं लागलं? काय करायचंय नेमकं तिला भविष्यात? का तिला स्थायिक व्हायचंय भारतात?

संस्कृत भाषेवर प्रेम

भारतासाठी तिनं तिचा देश सोडला.... ती फ्रेंच इंडियन गर्ल निमोनी... निमोनीचं वय ३४ वर्ष... तिचं काम तिच्या वयाहून अधिक मोठं... निमोनीला फ्रान्सपेक्षा भारतच आपलासा वाटतो. भारतातली प्रत्येक गोष्ट तिला आपलीशी वाटते. त्यासाठीच तिनं संस्कृत भाषेला जवळ केलं. तिचं हे प्रेमच तिला भारतात घेऊन आलं. 

तिला खादी आवडते... फॅशनेबल फ्रान्सची निमोनी स्व:त खादी घालते. निमोनीचं हे खादीप्रेम फक्त घालण्यापूरतं मर्यादित नाही. खादीला एका निश्चित मुक्कामापर्यंत नेण्यासाठी ती प्रयत्न करतेय.

अहमदाबादची झाली रहिवासी

गुजरातच्या अहमदाबादमध्ये निमोनी राहते. तिच्या अहमदाबादमध्ये राहण्यामागे कारण आहेत गांधीजी... गांधीजी खादी बनवणं अहमदाबादेतच शिकले होते... याच अहमदाबादेत निमोनीच्या आजोबांनीही आयुष्यातला मोठा काळ घालवलाय. जे शिकली जे कमावलं ते सारंच अहमदाबादेत...

रोजगार वाढवण्यासाठी निमोनीला खादी एक उत्तम साधन आहे, असं वाटतंय. म्हणूनच निमोनीनं आधी स्व:त खादी वापरायला सुरूवात केली आणि आता खादीचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम ती करतेय...

अहमदाबादेत फक्त एकाच ठिकाणी खादी विनली जाते. ही तिच जागा आहे जिथे धीमंत बढइया यांच्या पंजोबांनी गाधीजींना खादी विणायला शिकवली होती. आता, धिमंत बढिया यांचे कुटुंबिया निमोनीला खादी विणायला शिकवतायत.

खादीच्या प्रसारासाठी करायचंय काम

निमोनी फ्रान्सीस मुलगी आहे पण ती तिचं सारं काही फ्रान्समध्ये सोडून आलीय. भारतात तिनं गरीबी पाहिली... त्यामुळेच तिला आता भारत निर्माण कार्यात स्वत:ला झोकून द्यायचंय... गरीबांसाठी तिला काहीतरी करायचंय... तिनं निर्णय घेतलाय की फ्रान्समधलं सारं काही विकायचं आणि त्यातून खादीच्या प्रचार प्रसाराचं काम करायचं... खादी एका इंडस्ट्रीसारखी तिला वाटते... यात रोजगाराची मोठी संधी आहे. निमोनीला रोजगार उपलब्ध करून द्यायचायं. आयुर्वेदाचं शिक्षण घेऊन असहाय्य रुग्णांचे उपचार तिला करायचेयत.

एका सकारात्मक विचाराने निमोनीला फ्रान्समधून भारतात आणलं. तिला आता तिचं संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी वेचायचंय... १३२ कोटींचा देश भारत... आणि या देशात निमोनीसारख्या विचारांच्या लोकांची आज गरज आहे.