राहुल ५०० करोड देणार की माफी मागणार?

आसाम गण परिषदेच्या युवा शाखेनं बुधवारी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना नुकसान भरपाई म्हणून ५०० करोड रुपयांची कायदेशीर नोटीस पाठवलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 6, 2013, 12:58 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, गुवाहाटी
आसाम गण परिषदेच्या युवा शाखेनं बुधवारी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना नुकसान भरपाई म्हणून ५०० करोड रुपयांची कायदेशीर नोटीस पाठवलीय. यामध्ये उदार मनानं राहुल गांधींना माफी मागण्यासाठी १५ दिवसांचा अवधीही देण्यात आलाय.
आसाम गण परिषदेच्या म्हणण्यानुसार राहुल गांधी यांनी परिषदेवर टीका करताना, ‘आसाम गण परिषद उग्रवाद्यांच्या समर्थनामुळे दुसऱ्यांदा सत्तेवर आल्याचं’ जाहीर वक्तव्य केलं होतं. पार्टीच्या युवा शाखेच्या अध्यक्ष किशोर उपाध्याय यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘जर काँग्रेस उपाध्यक्षांना आपल्या या वक्तव्याबद्दल माफी मागितली नाही तर पक्षाची बदनामी करण्यासाठी आम्ही त्यांच्याकडून ५०० करोड रुपयांची नुकसान भरपाई मागण्याचा निर्णय घेतलाय. या नोटीशीला उत्तर देण्यासाठी आणि माफी मागण्यासाठी राहुल गांधींना आम्ही १५ दिवसांचा अवधी देत आहोत. जर १५ दिवसांत उत्तर मिळालं नाही तर आम्ही कायदेशीर मार्गानं मानहानीचा गुन्हा दाखल करू’
आसाम गण परिषद राहुला गांधीच्या या वक्तव्याचा निषेध करत असल्याचं पक्षाचे अध्यक्ष प्रफुल्ल कुमार महंत यांनी म्हटलंय. राहुल गांधींवर कायदेशीर कारवाईसाठी आम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेत असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

दरम्यान, आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी राहुल गांधींच्या या वक्तव्याचं समर्थनचं केलंय. आसाम गण परिषद उग्रवाद्यांच्या संपर्कात असल्याचंही त्यांनी म्हटलंय. आसाम गण परिषद उल्फाच्या मदतीनंच सत्तेत आल्याचं त्यांनी म्हटलंय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.