राहुल गांधी पुन्हा गायब

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी परदेश दौऱ्यावर रवाना झाले आहेत. 46 वा वाढदिवस साजरा करून राहुल गांधी परदेशामध्ये गेले आहेत.

Updated: Jun 20, 2016, 07:25 PM IST
राहुल गांधी पुन्हा गायब title=

नवी दिल्ली : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी परदेश दौऱ्यावर रवाना झाले आहेत. 46 वा वाढदिवस साजरा करून राहुल गांधी परदेशामध्ये गेले आहेत. खुद्द राहुल गांधींनीच ट्विटरवरून परदेशामध्ये जात असल्याचं राहुल गांधींनी सांगितलं आहे. 

वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या सगळ्यांचे आभार, काही दिवसांसाठी परदेश दौऱ्यावर जात आहे, असं ट्विट त्यांनी केलं आहे. राहुल गांधींकडे काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात येईल अशा चर्चा सुरु आहेत, त्यातच राहुल गांधी परदेश दौऱ्यावर गेल्यामुळे अनेक तर्क लढवले जात आहेत. 

याआधी लोकसभेचं अधिवेशन सुरु असतानाच राहुल गांधी अचानक 56 दिवस गायब झाले होते. यामुळे भाजपनं काँग्रेसवर जोरदार टीका केली होती. आता मात्र राहुल गांधींनी परदेश दौऱ्यावर जात असल्याचं सांगितलं आहे, पण ते कुठल्या देशामध्ये गेले आहेत, याबाबत मात्र गुप्तता ठेवण्यात आली आहे.