पाच मिनिटांच्या आत मिळणार विनाआरक्षित तिकिट

रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी अर्थसंकल्पात पेपरलेस तिकिट आणि प्रवाशांचा वेळ, त्रास वाचवण्यावर भर दिला आहे.

Updated: Feb 26, 2015, 02:25 PM IST
पाच मिनिटांच्या आत मिळणार विनाआरक्षित तिकिट title=

नवी दिल्ली : रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी अर्थसंकल्पात पेपरलेस तिकिट आणि प्रवाशांचा वेळ, त्रास वाचवण्यावर भर दिला आहे.

तुम्हाला स्टेशनवर गेल्यानंतर अवघ्या पाच मिनिटांच्या आत विनाआरक्षित तिकीट मिळणार आहे.

यासाठी रेल्वे स्टेशनवर वेंडिंग मशीन लावण्यात येणार आहे. डेबिटकार्डच्या सहाय्याने तुम्हाला विनाआरक्षण तिकिट काढता येणार आहे.

अनेक वेळा ऑनलाईन बुकिंग केल्यावर वेटिंग लिस्टला राहिलेले तिकिट हे रद्द होतं, तेव्हा ऐनवेळस विनाआरक्षित तिकिट घेण्यासाठी ही सुविधा महत्वाची असणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.