हिस्सारमध्ये तणाव: बाबा रामपाल समर्थक आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री

हरियाणातील स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू बाबा रामपाल यांना अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना रामपाल यांच्या समर्थकांनी विरोध केला असून पोलीस आणि समर्थकांमध्ये धुमश्चक्री सुरू आहे. पोलीस आश्रमात घुसू नयेत यासाठी रामपाल यांच्या हजारो भक्तांनी त्यांच्या आश्रमाला वेढा घालत पोलिसांवर दगडफेकही केली. 

Updated: Nov 18, 2014, 01:40 PM IST
हिस्सारमध्ये तणाव: बाबा रामपाल समर्थक आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री title=

हिस्सार: हरियाणातील स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू बाबा रामपाल यांना अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना रामपाल यांच्या समर्थकांनी विरोध केला असून पोलीस आणि समर्थकांमध्ये धुमश्चक्री सुरू आहे. पोलीस आश्रमात घुसू नयेत यासाठी रामपाल यांच्या हजारो भक्तांनी त्यांच्या आश्रमाला वेढा घालत पोलिसांवर दगडफेकही केली. 

समर्थकांना पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराचा मारा करावा लागला. या धुमश्चक्रीत पोलिसांसह अनेक भक्त जखमी झाले असून त्यांना उपाचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. 

दरम्यान बाबा रामपाल हे आश्रमात नसल्याची माहिती आश्रमाचे प्रवक्ते राज कपूर यांनी दिली आहे. त्यांची प्रकृती ठीक नसल्यानं त्यांना बाहेर हलवण्यात आल्याचं कपूर यांनी सांगितलें.मात्र त्यांचा ठावठिकाणा सांगण्यास त्यांनी नकार दिला. 

बाबा रामपालना अटक करण्यात उशीर करत असल्यावरून न्यायालयानं पोलिसांची कानउघडणी करत २१ नोव्हेंबरपर्यंत रामपाल यांना न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेशही दिले होते. त्यानंतर पोलिसांनी सतलोक आश्रमात बाबांना अटक करण्यास पोचले असताना बाबांच्या समर्थकांनी त्यांना विरोध करत त्यांच्यावर गोळीबार करण्याचाही प्रयत्न केला.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.