रांची : लग्न म्हणजे आशा आणि आकांशांचे सुंदर स्वप्न... रांचीतील एका तरूणी असेच स्वप्न पाहून सासरी गेली होती. पण जेव्हा सत्य समोर आले तेव्हा तिच्या सर्व स्वप्नांवर पाणी फिरले. तरुणीने आपल्यावर झालेल्या अत्याचारांची काहणी राज्य महिला आयोगासमोर मांडली.
रांचीमध्ये राहणाऱ्या या पीडित महिलेने सांगितले की, तिला धोका देऊन लग्न केले. त्यानंतर लग्नाच्या दुसऱ्या दिवशी हनिमूनला मला नरक यातना द्यायला सुरवात केली. अर्धा रात्री मला उठवून दारू प्यायला लावायचा. नाही प्यायली तर जबरदस्ती तोंड उघडून दारू पाजायचा.
एकदा मी दारू पिण्यास नकार दिला त्यावेळी त्याने दारूची बाटली बाहेर फेकली आणि मला कपडे उतरवायाल सांगितले आणि बाटली आणायला लावले. नाही केले तर मारहाण केली आणि घराबाहेर काढले.
तसेच माझा पती माहेरी आला असताना माझ्या लहान बहिणीशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. लहान बहिण जेवण देण्यास गेली तेव्हा त्याने हा प्रकार केला. घरातील गोष्ट म्हणून सर्व शांत झालेत.
एक मोठा फायनान्सर असून मोठ्या कंपनीत अधिकारी आहे. पण मुळात तिचा पती बेरोजगार होता. प्रकरणाची गंभीरता पाहून अधिकाऱ्यांनी निष्पक्ष चौकशी करण्याचे आश्वासन दिले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.