भोपाळ : मध्य प्रदेशचे गृहमंत्री बाबूलाल गौर यांनी रशिया दौऱ्याबाबत सांगताना तेथील महिलांनी गळाभेट घेऊन चुंबन घेत स्वागत केल्याचे म्हटले आहे. आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे गौर हे नेहमीच चर्चेत असतात.
सुमारे दहा वर्षांपूर्वी गौर यांनी केलेल्या रशिया दौऱ्याविषयी बोलण्यास सुरवात केली. आरोग्यसंबंधित विषयांवर आयोजित कार्यक्रमात महिलांच्या उपस्थितीत गौर यांनी रशियन महिलांच्या शरीराबाबतही वक्तव्य केले.
भाजपच्या प्रदेश कार्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलताना गौर यांनी हे किस्से रंगवले.
गौर म्हणाले, 'रशियातील महिला शारिरीकदृष्ट्या सुदृढ असतात. तेथील परंपरेनुसार त्यांनी माझी गळाभेट घेऊन चुंबन घेत स्वागत केले. भारतात अशा प्रकारे स्वागत झाल्यास, गदारोळ माजेल आणि नागरिकांचे जोडे खावे लागतील. माझे असे छायाचित्र भारतातील माध्यमांत प्रसिद्ध झाले असते, तर भाजपने मला तिकीटही दिले नसते.' तसेच रशियातील महिला मला कायम धोतराबाबत माहिती विचारत होत्या, असेही ते पुढे म्हणाले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.