RBIचे व्याजदर जैसे थे, महागाई वाढण्याची शक्यता

नोटाबंदीनंतर आज रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी जाहीर केलेल्या पतधोरणाच्या द्वैमासिक आढाव्यात व्याजाचे दर जैसे थेच ठेवण्याचा निर्णय घेतलाय. 

Updated: Dec 7, 2016, 03:45 PM IST
RBIचे व्याजदर जैसे थे, महागाई वाढण्याची शक्यता title=

मुंबई : नोटाबंदीनंतर आज रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी जाहीर केलेल्या पतधोरणाच्या द्वैमासिक आढाव्यात व्याजाचे दर जैसे थेच ठेवण्याचा निर्णय घेतलाय. 

नोटाबंदीनंतर देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकास दरात घट होईल, असं पतधोरण निश्चिती समितीचं मत आहे. त्याचप्रमाणे अमेरिकेत झालेली राष्ट्राध्यक्षांची निवड, कच्च्या तेलाच्या किमती आणि अनेक आंतरराष्ट्रीय घटनांचा धोका लक्षात घेऊन व्याजाचे दर 'जैसे थे'च ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं रिझर्व्ह बँकेनं म्हटलंय.

सध्या जरी महागाईचा दर अपेक्षेपेक्षा कमी असला, तरी चौथ्या तिमाहित म्हणजेच जानेवारी ते मार्च या काळावधीत महागाईचा भस्मासूर पुन्हा एकदा डोकं वार काढण्याची शक्यता आहे. त्यामुळे तूर्तास 'वेट अॅन्ड वॉच'ची भूमिका स्वीकारल्याचं रिझर्व्ह बँकेनं म्हटलंय.

नोटाबंदीच्या निर्णयाविषयी सविस्तर भाष्य नसलं, तरी सुद्धा त्याच्या परिणामांविषयी मात्र रिझर्व्ह बँकेनं पतधोरणाच्या आढाव्यात अनेक गोष्टींची नोंद केली आहे.