www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
रिझर्व्ह बँकेच्या आज तिमाही पतधोरण जाहीर झालंय. या पतधोरणात महत्त्वाच्या दरांमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत.
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. डी. सुब्बाराव यांच्या या अखेरच्या तिमाही पतधोरणात रेपो, रिव्हर्स रेपो आणि सीआरआरचे दर कायम ठेवण्यात आलेत. त्यामुळे सध्याचा रेपो रेट ७.२५ टक्के तर रिव्हर्स रेपो रेट ६.२५ टक्क्यांवर स्थिरावलाय. घसरलेला रुपया आणि वाढती महसुली तूट यावर लवकरात लवकर नियंत्रण आणण्याबाबत पावलं उचलण्याची सूचना सरकारला करण्यात आलीय. या आर्थिक वर्षात जीडीपीचा अंदाजही ५.७ टक्क्यांवरून ५.५ टक्क्यांवर घटवण्यात आलाय. रिटेल मार्केटमध्ये महागाई उच्च स्तरावर कायम आहे.
एकूणच अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी आता सरकारनं कडक पावलं उचलण्याची गरज असल्याचं आरबीआयचंही मत अनल्याचं या धोरणात स्पष्ट झालंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.