नवी दिल्ली : पाच हजाराच्या वरच्या जुन्या नोटा स्वीकारण्याविषयाच्या अधिसूचनेत रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा बदल केला आहे. कालच सरकारनं पाच हजारपेक्षा रक्कम बँकेत एकदाच भरता येईल असं म्हटलं होते.
आता या धोरणात बदल करण्यात आला असून केवायसीचे नियम पाळणाऱ्या सर्वांना पाचशे आणि हजाराच्या नोटांच्या स्वरुपात कितीही रक्कम भरता येणार आहे. 19 तारखेला यासंदर्भातल्या काढण्यात आलेल्या अधिसूचनेत आज हा बदल करण्यात आला आहे.
#RBI modifies old currency deposit rules; fully #KYC compliant account holders can deposit over Rs 5000 without any questions asked.
— Press Trust of India (@PTI_News) December 21, 2016
वारंवार होणाऱ्या बदलांवर विरोधक आणि जनतेमधून जोरदार टीका सुरू झाल्यावर आज रिझर्व्ह बँकेनं आणखी एक बदल करून विरोधकांना टीकेची आणखी एक संधी दिली आहे.