आता, २०० रुपयाची नोट जन्माला येणार?

500 आणि दोन हजार रुपयाच्या नव्या चलनी नोटानंतर रिझर्व्ह बँक आता 200 रुपयांची नोट आणण्याच्या तयारीत आहे.

Updated: Apr 4, 2017, 03:18 PM IST
आता, २०० रुपयाची नोट जन्माला येणार? title=

मुंबई : 500 आणि दोन हजार रुपयाच्या नव्या चलनी नोटानंतर रिझर्व्ह बँक आता 200 रुपयांची नोट आणण्याच्या तयारीत आहे.

रिझर्व्ह बँक जूननंतर या नोटा आणण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात रिझर्व्ह बँकेची एक बैठक झाली होती. या बैठकीत 200 रुपयांची नवी नोट आणण्याचा निर्णय घेतल्याचं समजतंय. 

मात्र, सरकारची मंजुरी मिळाल्यावर या नोटांच्या छपाईला सुरुवात होणार असल्याचं बोललं जातंय.