रेपो रेट घटले... होम लोन, कार लोन व्याजदर घटण्याची शक्यता

रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियानं गुरुवारी सकाळी रेपो रेटमध्ये ०.२५ टक्क्यांनी घट जाहीर केलीय. रेपो रेट कमी करण्याचा निर्णय तत्काळ लागू करण्यात आलाय. 

Updated: Jan 15, 2015, 12:22 PM IST
रेपो रेट घटले... होम लोन, कार लोन व्याजदर घटण्याची शक्यता title=

मुंबई : रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियानं गुरुवारी सकाळी रेपो रेटमध्ये ०.२५ टक्क्यांनी घट जाहीर केलीय. रेपो रेट कमी करण्याचा निर्णय तत्काळ लागू करण्यात आलाय. 

आरबीआय बँकांना ज्या व्याजदरावर कर्ज उपलब्ध करून देते तो रेपो रेट कमी झाल्यानंतर 'ईएमआय'मध्येही घट होण्याची शक्यता आहे. व्याज दर कमी होणं म्हणजेच, आता बँकांकडे  जास्त पैसे उपलब्ध असतील. हे पैसे त्या बाजारात उतरवू शकतात किंवा कर्ज म्हणून देऊ शकतात. महत्त्वाचं म्हणजे, खाद्य किंमती स्थिर राहिल्यानं बऱ्याच दिवसांनी आरबीआयनं व्याज दरांत घट जाहीर केलीय. यामुळे, बँका आपल्या घरांच्या कर्जात, गाडीच्या कर्जात व्याजदर घटवण्याची शक्यता निर्माण झालीय. 

आर्थिक वृद्धी लक्षात घेता भारतीय रिझर्व्ह बँकेनं गुरुवारी आपल्या व्याजदरांत ०.२५ टक्क्यांनी घट करून ७.७५ टक्क्यांवर आणलेत. रिझर्व्ह बँकेनं जानेवारी २०१४ पासून आपले व्याजदर आठ टक्क्यांवर स्थिर ठेवले होते.   

महागाई दर घटल्यानं आरबीआयनं हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येतंय. यामुळे, घरासाठी किंवा गाडीसाठी कर्ज घेणाऱ्यांच्या बँकांकडून अपेक्षा वाढल्या आहेत. अनेक बँकांना ईएमआय कमी करण्याचीही संधी आहे.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.