‘सोन्यात गुंतवणूक कमी करा’

डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत दिवसेंदिवस ढासळत चालल्यानं शेवटी वित्तमंत्री पी. चिंदबरम यांनी नागरिकांना दिलासा देण्यासाठी अर्थव्यवस्था स्थिर असल्याचं सांगितलंय. याचवेळी त्यांनी सोन्यात गुंतवणूक करू नका असा सल्लाही दिलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 13, 2013, 04:57 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत दिवसेंदिवस ढासळत चालल्यानं शेवटी वित्तमंत्री पी. चिंदबरम यांनी नागरिकांना दिलासा देण्यासाठी अर्थव्यवस्था स्थिर असल्याचं सांगितलंय. याचवेळी त्यांनी सोन्यात गुंतवणूक करू नका असा सल्लाही दिलाय.
‘अर्थव्यवस्थेला सांभाळण्यासाठी सरकारनं जी पावलं उचललेली आहेत त्यामुळे सध्या अर्थव्यवस्था स्थिर आहे. त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर स्पष्ट दिसतोय’ असं पी. चिदंबरम यांनी म्हटलंय. एका दिवसात अर्थव्यवस्थेमध्ये सुधार होणं शक्य नाही, त्यासाठी सरकारला प्रदीर्घ काळसाठी विचार करावा लागतो, अशी पुष्टीही त्यांनी यावेळी जोडलीय. गेल्या नऊ महिन्यांमध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेत सुधार झाल्याचं चिदंबरम यांचं म्हणणं आहे.
रुपयामध्ये झालेल्या घसरणीमुळे घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही. ही किंमत पुढेही अशीच ढासळत जाईल, असं जरुरी नाही. आयातीमध्ये झालेल्या तोट्यामुळे रुपयाची किंमत घसरलीय, महत्त्वाची बाब म्हणजे सोन्याची आयातही कमी झालीय आणि हा शुभ संकेत आहे, असं चिदंबरम यांनी म्हटलंय.

रुपयाच्या मजबुतीसाठी सोन्याऐवजी म्युच्युअल फंड, केवायसी, बॉन्ड यांच्यात गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलाय. सोन्याच्या आयातीत आणखी घट झाली तर त्याचा आपल्याला आनंदच होईल, असंही त्यांनी म्हटलंय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.