पटना : बिहारमधील भोजपुर जिल्हातील आरजेडीचे आमदार सरोज यादव यांची बहिण शैली देवीची भररस्त्यात छेड़छाड़ केली गेली. या दरम्यान झालेल्या धक्काबुकीत आणि हल्ल्यात त्यांचा दुर्देवी मृत्यू झालाय. सोमवारी रात्री ही घटना घडली. या प्रकरणी २ जणांनी सरेंडर केलं असून ३ जण अजून फरार.
शैली देवी औषध आणण्यासाठी बाहेर गेल्या होत्य. त्यादरम्यान रिक्षात बसलेल्या लोकांनी शैली देवीला छेड़ण्याचा प्रयत्न केला. त्याला विरोध केल्याने शैला देवीवर रॉडने हल्ला करण्यात आला.
आरजेडी आमदाराच्या बहिणीच्या मृत्यूनंतर राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. भाजप नेते सुशील मोदी यांनी यावरुन राज्य सरकारवर टीका केली आहे. यावरुन कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.
My sister was hit with rods and thrown out of an autorickshaw: RJD's Barhara (Bhojpur) MLA Saroj Yadav pic.twitter.com/aKGrptYXod
— ANI (@ANI_news) April 13, 2016