"आंबेडकर वाचण्याची इच्छा झाली, तर विष खाण्याची सक्ती करा"

सोशल मीडियावर काही लोकांनी रोहितने खासगी कारणामुळे आत्महत्या केल्याचं म्हटलं आहे, कारण रोहितने सुसाईड नोटमध्ये कुणालाही जबाबदार धरलेलं नाही. मात्र १८ सप्टेंबर रोजी विद्यापिठाला लिहिलेलं पत्र व्यवस्थित वाचलं तर, रोहितमध्ये विद्यापिठाने केलेल्या कारवाईपासून नाराजी आणि पीडित असल्याची भावना होती.

Updated: Jan 19, 2016, 03:51 PM IST
"आंबेडकर वाचण्याची इच्छा झाली, तर विष खाण्याची सक्ती करा" title=

हैदराबाद : सोशल मीडियावर काही लोकांनी रोहितने खासगी कारणामुळे आत्महत्या केल्याचं म्हटलं आहे, कारण रोहितने सुसाईड नोटमध्ये कुणालाही जबाबदार धरलेलं नाही. मात्र १८ सप्टेंबर रोजी विद्यापिठाला लिहिलेलं पत्र व्यवस्थित वाचलं तर, रोहितमध्ये विद्यापिठाने केलेल्या कारवाईपासून नाराजी आणि पीडित असल्याची भावना होती.

रोहितने कुलगुरूंना इंग्रजीत लिहिलेल्या पत्राच भाषांतर देत आहोत.

सेवेत, 
कुलगुरू
हैदराबाद विद्यापीठ

विषय - दलित समस्यांचं निराकरण

सर,
सर्वात आधी मी आपलं कौतुक करतो, तुमच्या या भूमिकेबद्दल जी तुम्ही हैदराबाद कॅम्पसमध्ये, दलित स्वाभिमान आंदोलनावर घेतली आहे. जेव्हा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अध्यक्षाला, दलितांविषयी असभ्य प्रतिक्रियेबद्दल प्रश्न विचारला जातो, तेव्हा तुमचा त्या विषयातील रस ऐतिहासिक असतो, पाच दलित मुलांचा बहिष्कार केला जातो, कॅम्पसमध्ये.

तुम्ही तर डोनाल्ड ट्रंप देखील लिलिपूट सिद्ध कराल. तुमची बांधिलकी पाहून, मी तुम्हाला दोन सल्ले देऊ इच्छीतो, एकदमच 'घिसा-पिटा' सारखा.

प्लिज, जेव्हा दलित विद्यार्थ्यांचं अॅडमिशन होत असेल, तेव्हा सर्व विद्यार्थ्यांना दहा मिलीग्रॅम सोडियम अजायड द्या. या इशाऱ्यावर की, जेव्हा ही त्यांना आंबेडकर वाचण्याची इच्छा होईल, तेव्हा हे त्यांनी खाऊन घ्यावं. सर्व दलित विद्यार्थ्याच्या खोलीत एक चांगली दोरीची व्यवस्था करा, यात तुमचे साथीदार मुख्य वॉर्डन यांची मदत घ्या.

आम्ही पीएचडीचे विद्यार्थी हा टप्पा पार करून चुकलो आहोत, आम्ही दलित स्वाभिमान आंदोलनाचा भाग झालो आहोत, ज्याला तुम्ही बदलू शकत नाही. आम्हाला हे सोडण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाहीय. यासाठी मी आपल्याला निवेदन करू इच्छीतो की, आमच्या सारख्या विद्यार्थ्यांना युथेनेसिया सारखी सुविधा उपलब्ध करून द्यावी.

मी कामना करतो की, तुम्ही आणि कॅम्पस नेहमी शांततेत रहा.

आपला,
वेमुला रोहित