राज्यसभेत अनुपस्थित राहणारा सचिन विकासकामांत पुढे

भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर खासदार म्हणून राज्यसभेत कमी वेळा उपस्थित राहिला असला तरी त्याने सदस्य म्हणून केलेले काम वाखाणण्याजोगे आहे. सचिनने खासदारांना दिल्या जाणाऱ्या विकासनिधीतील तब्बल ९० टक्के रक्कम खर्च केलीय. इतकेच नव्हे तर सचिनने जम्मू आणि तामिळनाडूमध्ये आलेल्या पुरानंतर तेथे शाळा आणि पूल बनवण्यासाठी निधीही दिलाय. तसेच उत्तराखंडच्या चामोलीसाठीही निधी दिलाय.

Updated: Dec 24, 2015, 01:26 PM IST
राज्यसभेत अनुपस्थित राहणारा सचिन विकासकामांत पुढे title=

नवी दिल्ली : भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर खासदार म्हणून राज्यसभेत कमी वेळा उपस्थित राहिला असला तरी त्याने सदस्य म्हणून केलेले काम वाखाणण्याजोगे आहे. सचिनने खासदारांना दिल्या जाणाऱ्या विकासनिधीतील तब्बल ९० टक्के रक्कम खर्च केलीय. इतकेच नव्हे तर सचिनने जम्मू आणि तामिळनाडूमध्ये आलेल्या पुरानंतर तेथे शाळा आणि पूल बनवण्यासाठी निधीही दिलाय. तसेच उत्तराखंडच्या चामोलीसाठीही निधी दिलाय.

सचिन तीन वर्षांपूर्वी खासदार बनला होता. मात्र त्यानंतर तो राज्यसभेत खूप कमी वेळा उपस्थित राहिला. तसेच त्याने यादरम्यान जास्त प्रश्नही उपस्थित केले नाही. यावरुन प्रसारमाध्यमांमध्ये जोरदार चर्चा रंगली. सचिनने आंध्र प्रदेशमधील नेल्लोर जिल्ह्यातील पुत्तमराजू कांद्रिगा हे गाव संसदेच्या आदर्श ग्राम विकास योजनेंतर्गत दत्तक घेतले होते. या विकासातील विकास कामांचे कौतुक ग्रामीण विकास मंत्रालयानेही केले. ट

भोपाळमध्ये झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान या गावांत झालेल्या विकासकामांबद्दल एक डॉक्युमेंटरी दाखवण्यात आली होती. सचिनने संसदेच्या एकूण कामकाजातील २५३ दिवसांपैकी १३ दिवस उपस्थिती दर्शवली. यादरम्यान त्याने सात प्रश्न उपस्थित केले होते.