बंगळुरू: कन्नड अभिनेत्रीवरील बलात्कार प्रकरणी केंद्रीय रेल्वे मंत्री सदानंद गौडांचा मुलगा कार्तिक गौडा विरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आलाय. बंगळुरूच्या एका कोर्टानं हा अटक वॉरंट जारी केलाय.
तर दुसरीकडे कार्तिकवर बलात्काराचा आरोप करणारी कन्नड अभिनेत्री मैत्रेयी स्वत: संशयाच्या भोवऱ्यात आलीय. कन्नड चित्रपटांचे दिग्दर्शक ऋषीनं दावा केलाय की, जुलै 2004मध्ये मैत्रेयीसोबत त्याचं लग्न झालंय. ऋषीनं बंगळुरू पोलिसांकडे मैत्रेयी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय.
कार्तिक गौडावर कन्नड अभिनेत्री मैत्रेयीनं बलात्कार आणि फसवणुकीचा आरोप लावलाय. अभिनेत्रीनं दावा केलाय की, तिचं कार्तिकसोबत लग्न झालंय आणि ती त्याच्या मुलाची आई होणार आहे.
नुकतंच कार्तिक गौडाचा दुसऱ्या मुलीसोबत साखरपुडा झालाय. या साखरपुड्यानंतरच अभिनेत्रीनं कार्तिक गौडा बद्दल हा आरोप केला. तिचं म्हणणं आहे की, कार्तिक तिचा नवरा आहे आणि दुसऱ्या कुणाचाही ती नवरा म्हणून स्वीकार करू शकत नाही.
या आरोपांनंतर केंद्रीय रेल्वे मंत्री सदानंद गौडा म्हणाले, हा आपल्याला कुटुंबियांना ब्लॅकमेल करण्यासाठी केला गेलाला फार्स आहे. तर कार्तिकनंही मैत्रेयीचे आरोप खोटे असल्याचं म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.