सहारनपूर/लखनऊ : उत्तर प्रदेशातील सहारणपूरमध्ये उसळलेल्या दंगलीप्रकरणी आतापर्यंत २० जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईनंतर हिंसाचार आटोक्यात आला असला तरी इथला कर्फ्यू कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळं वातावरण तणावपूर्ण आहे.
उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये दोन गटांत जमिनीशी संबंधित उफाळून आलेल्या वादाचं रूपांतर दंगलीत होऊन तीन जण ठार तर 19 जखमी झाले आहेत. परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्रानं निमलष्करी दलाच्या 600 जवानांची तुकडी उत्तर प्रदेशात पाठवली आहे.
या दंगलीमध्ये एक व्यापारी हरीश कोचर, अरिफ आणि एका अज्ञात व्यक्तीचा बळी गेला आहे. तसंच धुमश्चक्रीत पाच पोलीस, शहर दंडाधिकारी इतर १३ जण जखमी झाले आहे. त्यातील एका पोलीस कर्मचाऱ्यालाही गोळी लागली असून तो गंभीर जखमी आहे,' असं सहारनपूरचे आयुक्त तन्वीर जाफर अली यांनी सांगितलंय. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी, पोलिसांनी रबरी बुलेट्सनी गोळीबार केला.
काय घडलं नेमकं?
सहारनपूरमधील एका जमिनीवरून दोन समाजात वाद होता. शनिवारी सकाळी एका गटानं या जमिनीवर बांधकामास सुरुवात केली. त्यामुळे दुसरा गट संतप्त होऊन हाणामारीस सुरुवात केली. परस्परांवर विटा, दगड फेकण्यात आले. दुकानांना आगी लावल्या.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.