होय, हे सूटा-बुटातलंच सरकार - संजय राऊत

होय, हे सुटा-बुटातलंच सरकार आहे, असं म्हटलंय शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी... असं म्हणतानाच त्यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना टोलाही लगावलाय.

Updated: May 13, 2015, 01:33 PM IST
होय, हे सूटा-बुटातलंच सरकार - संजय राऊत title=

नवी दिल्ली : होय, हे सुटा-बुटातलंच सरकार आहे, असं म्हटलंय शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी... असं म्हणतानाच त्यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना टोलाही लगावलाय.

हे सुटाबुटातलंच सरकार आहे, पण सूट-बूट घालणं काही गुन्हा आहे काय? असा प्रश्न विचारत त्यांनी राहुल गांधींना धारेवर धरलंय.  

काही दिवस विश्रांती घेऊन दाखल झालेल्या राहुल गांधी यांनी मोदी सरकारला उद्देशून 'सूटा - बूटातलं सरकार' म्हणत जोरदार हल्ला केला होता. यावरच संजय राऊत प्रतिक्रिया देत होते. 

दरम्यान जनतेला दिलेल्या आश्वासनानुसार, परदेशात लपवलेला काळा पैसा लवकरात लवकर भारतात परत आणण्याची प्रक्रिया सुरू झालीय... असंही संजय राऊत यांनी म्हटलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.