सुकमा हल्ल्यातील ४ नक्षलवाद्यांना अटक

छत्तीसगडमधील सुकमामध्ये सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या हल्ल्यातील प्रकरणात ४ नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे. या चौघे हल्ल्यात सहभागी असल्याची शक्यता आहे. यामध्ये १ जण अल्पवयीन आहे.

Updated: May 4, 2017, 03:51 PM IST
सुकमा हल्ल्यातील ४ नक्षलवाद्यांना अटक title=

सकुमा : छत्तीसगडमधील सुकमामध्ये सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या हल्ल्यातील प्रकरणात ४ नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे. या चौघे हल्ल्यात सहभागी असल्याची शक्यता आहे. यामध्ये १ जण अल्पवयीन आहे.

हल्ला झालेल्या ठिकाणापासून २० किमी अंतरावर चिंतागुफा जवळ या चौघांना अटक करण्यात आली आहे. या हल्ल्यात गांववाल्यांची भूमिका देखील संशयास्पद असल्याची शक्यता आहे. हल्ल्याच शहीद झालेल्या जवानांच्या शरीरावरून बुलेटप्रूफ जॅकेट उतरवण्याचं आणि हत्यार हिसकावून घेण्यामध्ये गावावाल्यांचा हात असल्याचा संशय आहे.

सुकमामध्ये झालेल्या या नक्षलवादी हल्ल्यात सीआरपीएफचे २५ जवान शहीद झाले होते. हल्ल्याचा मास्टरमाइंड हिडमा अजूनही हाती लागलेला नाही. या हल्ल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त होत होता. या प्रकरणात लवकर कारवाई करण्याचा दबाव सुरक्षा यंत्रणांवर आहे.