१५ दिवस जमिनीखाली राहूनही जिवंत

बिहारमील मधेपुरा जिल्ह्यातील बाबा प्रमोदची सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे. त्याला कारणही तसेच आहे. १५ दिवस जमिनीखाली राहूनही बाबा प्रमोद जिवंत राहिल्याने सर्वत्र या चमत्काराची चर्चा होतेय. 

Updated: Mar 14, 2016, 11:29 AM IST
१५ दिवस जमिनीखाली राहूनही जिवंत title=

मधेपुरा : बिहारमील मधेपुरा जिल्ह्यातील बाबा प्रमोदची सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे. त्याला कारणही तसेच आहे. १५ दिवस जमिनीखाली राहूनही बाबा प्रमोद जिवंत राहिल्याने सर्वत्र या चमत्काराची चर्चा होतेय. 

मिळालेल्या माहितीनुसार, बाबा प्रमोद यांनी १५ दिवसांपूर्वी म्हणजेच २८ फेब्रुवीरी रोजी चौसा ठाण्याच्या हद्दीतील भटगामा गावात समाधी घेतली होती. बाबांच्या समाधीसाठी १० फूट लांब, १० फूट रुंद आणि १५ फूट खोल खड्डा खणला होता. बाबा या खड्ड्यात बसल्यानंतर त्यांच्या भक्तांनी हा खड्डा मातीने भरुन बंद केला होता. 

अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी हा खड्डा खणण्यास सुरुवात केली. पोलिसांचे पथक तसेच डॉक्टरांचे एक पथकही तेथे हजर होते. अखेर या बाबांना बाहेर काढण्यात आले. मात्र यावेळी तेथे या बाबांचे अनेक भक्तगण उपस्थित असल्याने पोलिसांना काही कारवाई करता आली नाही.