पांढऱ्या वाघिणीनं दिला सात बछड्यांना जन्म!

एका सात वर्षांच्या पांढऱ्या रंगाच्या वाघिणीनं एकाच वेळी तब्बल बछड्यांना जन्म दिलाय. कल्पना असं या वाघिणीचं नाव आहे. `नॅशनल झुओलॉजिकल पार्क`च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही अतिशय दुर्मिळ घटना आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 23, 2014, 05:15 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
एका सात वर्षांच्या पांढऱ्या रंगाच्या वाघिणीनं एकाच वेळी तब्बल सात बछड्यांना जन्म दिलाय. `कल्पना` असं या वाघिणीचं नाव आहे. `नॅशनल झुओलॉजिकल पार्क`च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही अतिशय दुर्मिळ घटना आहे.
नॅशनल पार्कमध्ये असलेल्या सात वर्षांच्या विजय आणि कल्पना यांची ही अपत्यं... या सात बछड्यांना थंडीपासून वाचवून योग्य तपमान पुरविण्यासाठी पशू चिकित्सकांची धडपड सुरू आहे. नवजात सात बछड्यांपैकी दोन जणांची प्रकृती गंभीर आहे. पण, पशु चिकित्सकांचं त्यांच्या प्रकृतीवर लक्ष आहे. इतर चार बछडे मात्र वाचण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
`माझ्या माहितीप्रमाणे, भारतात अशी घटना पहिल्यांदाच घडतेय. तज्ज्ञ २४ तास त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष ठेवून आहेत. त्यांची आई सुखरुप आहे` असं प्राणिसंग्रहालयाचे प्रमुख (शिक्षण) रियाझ खान यांनी म्हटलंय.
२००३ साली अशीच घटना अर्जेंटीनामध्ये `ब्यूनस आयर्स` या शहरातील एका प्राणिसंग्रहालयात घडली होती. एका पांढऱ्या वाघिणीच्या या बछड्यांनी आपले डोळे उघडण्यासाठी दोन आठवड्यांचा कालावधी घेतला होता. दुर्मिळ अशा पांढऱ्या वाघांची संख्या लक्षात घेता प्राणितज्ज्ञांसाठी ही फार महत्त्वाची घटना आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.