काश्मीरमधील वंशवादी सरकार बदला - अमित शाह

जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीआधी भाजप अध्यक्ष अमित शाहने काश्मीर लोकांना आश्वासन देण्यास सुरुवात केली आहे. भाजप या क्षेत्राला न्याय देईल. गेली ६० वर्षे येथील सरकारने येथील जनतेवर अन्याय केला आहे.

Updated: Aug 26, 2014, 08:52 AM IST
काश्मीरमधील वंशवादी सरकार बदला - अमित शाह title=

कठुआ, जम्मू काश्मीर : जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीआधी भाजप अध्यक्ष अमित शाहने काश्मीर लोकांना आश्वासन देण्यास सुरुवात केली आहे. भाजप या क्षेत्राला न्याय देईल. गेली ६० वर्षे येथील सरकारने येथील जनतेवर अन्याय केला आहे.

कठुआमध्ये अमित शाह यांनी प्रचार रॅली काढली. यावेळी त्यांनी काश्मीरी जनतेला साद घातली आहे. उमर अब्दुला सरकारवर यावेळी त्यांनी जोरदार टीका केली. याठिकणी वंशवादी राजकारण केले जात आहे. त्यांचा आता तुम्ही त्याग करा, असे ते म्हणालेत. येथे भाजपचे सरकार आले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर काम करताना राज्याची प्रगती होईल, असे ते म्हणालेत.

गेली ६० वर्षे जम्मू भागात जनता अन्यायाचा सामना करीत आहे. मात्र, भाजप सरकार येथील जनतेला न्याय देण्याचे काम करील. भाजप देशात काँग्रेस मुक्त करण्यासाठी लढत आहे. हा हिस्सा जम्मूबाबतीतही आहे. जम्मूकाश्मीर काँग्रेस मुक्त करण्यासाठी राज्यातील अब्दुला आणि मुफ्ती महमद को मुक्त केले पाहिजे, असे ते म्हणालेत.

पाकिस्तानकडून सीमाभागात करण्यात येणाऱ्या गोळीबाराला भाजप सरकार चोख उत्तर देईल, असे सांगून १९६२, १९६५ आणि १९७१ मधील युद्धातील पिडीतांना न्याय देण्याचे काम भाजप करील, असे त्यांनी स्पष्ट केले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.