मोदी लाट ओसरली - काँग्रेस

 बिहार, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि पंजाब या चार राज्यांमध्ये विधानसभेच्या 18 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीतील दहा जागा काँग्रेस व मित्रपक्षांनी जिंकल्या आहेत. या निकालांवर भाष्य करताना काँग्रेस प्रवक्ते शकील अहमद यांनी भाजपच्या मोदी लाटेची खिल्ली उडवली. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपने संपूर्ण देश मोदीमय झाल्याचा आणि मोदींच्याच नावावर मते मिळतील, असा प्रचार चालवला होता; परंतु ही लाट ओसरत चालली आहे. 

Updated: Aug 26, 2014, 08:41 AM IST
 मोदी लाट ओसरली - काँग्रेस title=

नवी दिल्ली : बिहार, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि पंजाब या चार राज्यांमध्ये विधानसभेच्या 18 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीतील दहा जागा काँग्रेस व मित्रपक्षांनी जिंकल्या आहेत. या निकालांवर भाष्य करताना काँग्रेस प्रवक्ते शकील अहमद यांनी भाजपच्या मोदी लाटेची खिल्ली उडवली. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपने संपूर्ण देश मोदीमय झाल्याचा आणि मोदींच्याच नावावर मते मिळतील, असा प्रचार चालवला होता; परंतु ही लाट ओसरत चालली आहे. 

बिहारमध्ये दहापैकी सहा जागा जिंकून लालूप्रसाद यादव-नितीशकुमार आघाडीने भाजपचा पराभव केला. तर कर्नाटकमध्ये तीनपैकी दोन जागा काँग्रेसने जिंकत बाजी मारली आहे. पोटनिवडणुकीत मोदी फॅक्टरचा प्रभाव दिसून आला नाही.

बिहारमधील पोटनिवडणुकीच्या निकालामुळे आगामी काळात महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील राजकीय समीकरणेही बदलण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट ओसरल्याचे दिसू लागल्याने महाराष्ट्रात युतीचा घटक असलेली शिवसेना अधिक आक्रमक होईल, अशी चिन्हे आहेत.  

महाराष्ट्र, हरयाणा, छत्तीसगढ या राज्यांमधील आगामी विधानसभा मिवडणुकीतही असाच प्रभाव दिसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. प्रत्येक राज्यातील राजकीय परिस्थिती वेगळी असली तरी मोदी लाट ओसरल्याने अन्य पक्षांच्या आशा पल्लवित होऊ लागल्या आहेत. 

गेल्या महिन्यात उत्तराखंडमध्ये झालेल्या तिन्ही मतदारसंघांतील पोटनिवडणूक जिंकून काँग्रेसने भाजपला धक्का दिला होता. महिन्याभराचा विचार करता २१ पैकी १३ जागा काँग्रेस वा मित्र पक्षांनी जिंकल्या आहेत. भाजप वा मित्र पक्षांना आठच जागांवर समाधान मानावे लागले. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.