असे बनतात शंकराचार्य

प्राचीन भारतीय सनातन परंपरेच्या विकासात तसेच हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसारात आदि शंकराचार्य यांचं मोठं योगदान आहे.

Updated: Jul 6, 2014, 04:34 PM IST
असे बनतात शंकराचार्य title=

नवी दिल्ली : प्राचीन भारतीय सनातन परंपरेच्या विकासात तसेच हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसारात आदि शंकराचार्य यांचं मोठं योगदान आहे.

यासाठी भारतातील सनातन परंपरेचा संपूर्ण देशात प्रचार प्रसार करता यावा यासाठी, देशाच्या चारही दिशांना चार शंकराचार्यांच्या मठाची स्थापना करण्यात आली आहे.

ईसा पूर्व आठव्या शताब्दीमध्ये स्थापन करण्यात आलेल्या चार मठांमध्ये आजही चार शंकराचार्यांच्या नेतृत्वात सनातन परंपरेचा प्रचार प्रसाराचं कार्य सुरू आहे.

देशाच्या पूर्व भागात गोवर्धन, जगन्नाथपुरी, पश्चिमेत शारदामठ, गुजरात, उत्तरमध्ये ज्योतिर्मठ, बद्रीधाम आणि दक्षिणेत शृंगेरी मठ, रामेश्वर मठाची स्थापना करण्यात आली आहे.

आदि शंकराचार्य यांच्या चारही मठांशिवाय संपूर्ण देशात बारा ज्योतिर्लिंगाची स्थापन करण्यात आली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.