शरद पवारांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे. ही भेट नेमकी कशासाठी होती, याचे कारण समजू शकलेले नाही. दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत चर्चा झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Updated: Oct 12, 2016, 10:44 PM IST
शरद पवारांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट  title=
संग्रहित छाया

नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे. ही भेट नेमकी कशासाठी होती, याचे कारण समजू शकलेले नाही. दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत चर्चा झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

पंतप्रधानांच्या निवासस्थानी पवार यांनी ही भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे. या भेटीबाबत राजकीय वर्तुळात मोठी चर्चा आहे. महाराष्ट्र राज्यातील सध्याचे तणाव वातावरण पाहता मोदी आणि पवारांची ही भेट महत्त्वपूर्ण मानली जाते आहे.

मराठा समाजाचे मोर्चे, या समाजातील असंतोष आणि त्याचे निवडणुकीतील परिणाम या सगळ्याचा विचार करुन ही भेट झाल्याचे समजते आहे.