शरद पवारांनी घेतली पंतप्रधानांची भेट, दुष्काळग्रस्तांच्या मदतीची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. महाराष्ट्रात दुष्काळामुळं अतोनात नुकसान झालं असून केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी पवारांनी पंतप्रधानांकडे केलीय. 

Updated: Sep 14, 2015, 09:01 PM IST
शरद पवारांनी घेतली पंतप्रधानांची भेट, दुष्काळग्रस्तांच्या मदतीची मागणी title=

नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. महाराष्ट्रात दुष्काळामुळं अतोनात नुकसान झालं असून केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी पवारांनी पंतप्रधानांकडे केलीय. 

महाराष्ट्रात साखरेचे साठे पडून आहेत. त्यातील ३० हजार टन साखर निर्यात झाली पाहिजे, अशी अपेक्षा पवारांनी व्यक्त केलीय. 

तर ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब विखे पाटील आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी केलेल्या टीकेची खिल्ली उडवली.

पाहा व्हिडिओ - 

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.