बेळगाव : कर्नाटक पोलिसांनी मराठी भाषिकांवर अमानुष लाठीमार करत घरात घुसून मारहाण केली. या मराठी भाषिकांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी बेळगावात गेलेले शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी पत्रकार परिषद घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पत्रकार परिषद घेण्यास मज्जाव करत त्यांची पत्रकार परिषद उधळून लावली.
शिवसेनेचे शिष्टमंडळ शुक्रवारी बेळगावात पोहोचले. या शिष्टमंडळाचे आमदार दिवाकर रावते यांनी नेतृत्व केले आहे. हे शिष्टमंडळ बेळगावमधील मराठी भाषिकांच्या व्यथा जाणून घेणार आहेत. मात्र शिवसेना शिष्टमंडळाला बेळगावात पोलीस विरोधाला सामोरे जावे लागले.
शिवसेना शिष्टमंडळाला येळ्ळूरमध्ये प्रवेश बंदी करण्यात आल्याचे वृत्त आहे. कर्नाटक पोलिसांनी शिवसेना आमदारांना पत्रकार परिषद घेण्यापासूनही रोखल्याने शिवसेना कार्यकर्ते संतप्त झाले आहे. याबाबत आपण आयजींकडे तक्रार करणार असल्याचे दिवाकर रावते यांनी सांगितले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.