पणजी : गोव्यात धक्कादायक बाब उघड झाली आहे. एका कपड्याच्या शोरुममध्ये कपडे बदलण्याच्या रुममध्ये छुपा कॅमेरा लावल्याचे पुढे आलेय. ही बाब केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री स्मृती इराणी यांना हा धक्कादायक प्रकार दिसला. त्यानंतर तक्रार दाखल करण्यात आली आहे.
स्मृती इराणी या पतीसह गोव्यात सुट्टीवर आहेत. त्या गोव्यातील एका प्रसिद्ध कपड्यांच्या शोरुममध्ये गेल्या होत्या. त्यावेळी कपडे बदलण्याच्या खोलीजवळ एक छुपा कॅमेरा लावल्याचे आढळून आले. याबाबत स्मृती इराणी यांनी तीव्र नाराजी व्यक्त करुन तक्रार दाखल केली.
पोलिसांनी कॅमेऱ्याची हार्ड डिस्क आणि कॅमेरा जप्त केला आहे. तसेच स्टोअरमधील कर्मचाऱ्यांची चौकशी पोलिसांकडून करण्यात येत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.