अडवाणींचा लग्नाचा वाढदिवस सोनियांसाठीही खास!

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारं पत्र धाडलं. हे पत्र लिहिताना, अनेकदा कणखरपणे परिस्थितीला सामोऱ्या गेलेल्या सोनियाही भावूक झालेल्या दिसल्या.

Updated: Feb 26, 2015, 04:46 PM IST
अडवाणींचा लग्नाचा वाढदिवस सोनियांसाठीही खास! title=

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारं पत्र धाडलं. हे पत्र लिहिताना, अनेकदा कणखरपणे परिस्थितीला सामोऱ्या गेलेल्या सोनियाही भावूक झालेल्या दिसल्या.

२५ फेब्रुवारी हा लालकृष्ण अडवाणी आणि त्यांच्या पत्नी कमला अडवाणी यांच्या लग्नाचा वाढदिवस हा सोनियांसाठीही खास आहे... याचं कारण देताना सोनिया पत्रात म्हणतात, 'याच दिवशी आपण स्वर्गीय राजीव गांधी यांच्याशी साता-जन्माची गाठ बांधली होती. राजीव गांधी जिवंत असते तर यंदा आमच्याही लग्नाचा ४७ वा वाढदिवस आम्ही एकत्र साजरा केला असता.

सोनियांनी अडवाणींना लग्नाची ५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी धाडलेल्या पत्रात म्हटलंय.... 'लग्नाच्या ५०व्या वाढदिवसानित्तानं मी तुम्हाला आणि श्रीमती कमला अडवाणी यांना खूप खूप शुभेच्छा देत आहे. तुम्ही ५० वर्ष एकत्र व्यतीत केलीत. जीवनातल्या प्रत्येक चढ-उतारात एकमेकांना साथ दिलीत... मजबुती दिलीत.... आणि वास्तवात हे एक महान वरदान आहे'. 

अडवाणींच्या लग्नाच्या वाढदिवसा निमित्तानं सध्या फारशा बिझी नसलेल्या सोनियांना आपल्या आयुष्यातील राजीव गांधींसोबत घालवलेल्या क्षणांचीही आठवण झालेली दिसून आली. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.