नवी दिल्ली : नागालँडमधील दहशतवादी संघटनेसोबत करार केल्यानंतर काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. केंद्रातील मोदी सहकार हे अहंकाराचे प्रतिक असल्याचा थेट हल्लाबोल सोनिया गांधी यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईशान्येकडील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना विश्वासात न घेता नागालँडमधील दहशतवादी संघटनेसोबत करार केला. हे मोदी सरकारचे उद्धट वागणे असल्याचे स्पष्ट होते अशा शब्दांत सोनिया गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला.
काँग्रेसच्या 25 खासदारांना निलंबित केल्यानंतर काँग्रेसने तिसऱ्या दिवशीही आपले धरणे आंदोलन सुरुच ठेवले आहे. यावेळी सोनिया गांधी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मोदींवर टीका केली. नागालँडमधील करार हा ऐतिहासिक असेलही, पण ज्या राज्यांवर या कराराचा परिणाम होणार आहे, त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना मोदींनी विश्वासात घेतले नाही. सर्वांना सोबत घेऊन चालू, असे मोदी सरकार नेहमी सांगते. मग आता काय झाले, असा बोचरा सवालही त्यांनी उपस्थित केला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.