नवी दिल्ली : राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर संसदेत जोरदार खडाजंगी सुरू असताना, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी थोड्याशा गोंधळलेल्या स्थितीत होत्या. कारण सोनिया गांधींची शॉल पर्सच्या चेनमध्ये अडकली होती.
सोनिया गांधी यांनी भरपूर प्रयत्न करूनही शॉल आणि चेनची पकड काही सुटत नव्हती, तेव्हा काँग्रसचे खासदार मल्लिकार्जुन खर्गे यांनी मदत देऊ केली, सोनियांनीही ती मदत लगेच स्वीकारली.
मल्लिकार्जुन खर्गेंनाही खूप सारा वेळ लागला आणि सोनिया गांधी यांची शॉल पर्सच्या चेनच्या जबड्यातून सुटली. ग्रे रंगाची शॉल चेनमध्ये अडकूनही फाटली नसल्याने सोनिया गांधी यांनीही समाधान व्यक्त केलं आणि सुटकेचा निश्वास टाकला.