नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदी जाहीर केल्यानंतर ज्या व्यक्तींनी १० लाखाहून अधिक रक्कम बँकेत जमा केलीये त्यांना पुढील काही दिवसांतच इनकम टॅक्स विभागाकडून नोटीस मिळणार आहेत. बँकेत जमा केलेल्या या रकमेबाबतची आयटीकडून चौकशी केली जाणार आहे.
डिपार्टमेंटकडे जी माहिती आहे त्यानुसार, नोटाबंदीच्या निर्णय़ानंतर १.५ लाख बँक खात्यांमध्ये १० लाखाहून अधिक रक्कम जमा करण्यात आलीये. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस(सीबीडीटी)च्या नव्या ई-प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून या खातेधारकांशी संपर्क केला जाणार आहे. त्यांना ऑनलाइन उत्तर द्यावे लागेल.
गेल्या दोन महिन्यात आयटी विभागाने टाकलेल्या विविध छाप्यांमध्ये ६०० कोटी रुपयांची रोकड जप्त केलीये. यात १५० कोटी रुपयांच्या नव्या नोटांचा समावेश आहे.
१.५ लाख बँक खात्यांमध्ये १० लाखसे अधिक रुपये जमा करण्यात आलेत याव्यतिरिक्त १ कोटी खात्यांमध्ये संशयास्पद रक्कम जमा करण्यात आलीये. ७५ लाख लोकांची खाती आहेत.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या १.५ लाख लोकांच्या खात्यामध्ये १० लाखाहून अधिक रक्कम जमा झालीये त्या खात्यांबाबत आधी चौकशी केली जाणार आहे.