नवी दिल्ली: बजेट एअरलाइन्स स्पाइसजेट आपल्या नव्या मोबाईल अॅपवर अवघ्या एक रुपयांत विमानाचं तिकीट उपलब्ध करून देतंय. काही ठराविक काळासाठी ही ऑफर आहे. यात भाड्यातील टॅक्स किंवा फीचा समावेश नाहीय. प्रवासी १५ जुलै ते पुढील वर्षी ३१ मार्चपर्यंत या तिकीटांवर प्रवास करू शकतो.
तीन दिवसांसाठी ही ऑफर आहे सोबतच प्रवाशांना रिटर्नचं तिकीटही बुक करावं लागेल ही अट घालण्यात आलीय. विमान कंपनीनं आपल्या जाहिरातीत सांगितलंय, आजपासून म्हणजे १५ जुलैपासून या तिकीटांसाठी बुकिंग सुरू होईल. १ लाख सीट्स यासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
कंपनीच्या 'रेड हॉट स्पायसी' ऑफरचा वापर फक्त मोबाईल अॅपवरच उपलब्ध आहे. कंपनीनं अॅपलच्या आयओएस आणि अँड्रॉइड प्लॅटफॉर्मसाठी अॅप सुरू केलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.