श्रीलंकेच्या वेबसाईटवर मोदी आणि जयललितांचा वादग्रस्त फोटो

संरक्षण मंत्रालयाच्या वेबसाइटवर वादग्रस्त लेख आणि फोटोबाबत श्रीलंकेच्या पंतप्रधानांनी नरेंद्र मोदी आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री जयललिता यांची विना शर्त क्षमा मागितलीय.

Updated: Aug 1, 2014, 10:47 PM IST
श्रीलंकेच्या वेबसाईटवर मोदी आणि जयललितांचा वादग्रस्त फोटो title=
श्रीलंकेच्या संरक्षण मंत्रालयाच्या वेबसाइटवरील वादग्रस्त फोटो

नवी दिल्ली : संरक्षण मंत्रालयाच्या वेबसाइटवर वादग्रस्त लेख आणि फोटोबाबत श्रीलंकेच्या पंतप्रधानांनी नरेंद्र मोदी आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री जयललिता यांची विना शर्त क्षमा मागितलीय.

श्रीलंकेनं माफी मागत म्हटलं, लेख कोणत्याही परवानगी शिवाय वेबसाइटवर टाकला गेला आणि एवढंच नव्हे तर हा लेख सरकारची कोणतेही विचार दर्शवत नाही. 

श्रीलंकेची संरक्षण मंत्रालयाची वेबसाइट www.defence.lk  वर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तमिलनाडूच्या मुख्यमंत्री  जयललिता यांचा वादग्रस्त फोटो टाकून त्यासोबत एक प्रेमपत्र असं चित्र रेखाटलं गेल्यानं हा वाद सुरु झाला आहे. 

यात जलिलता या मोदींचा विचार करत असल्याचं दाखवलं गेलं आहे. नरेंद्र मोदींना जयललितांनी लिहिलेली प्रेमपत्रं किती योग्य आहेत? असं शिर्षकही या फोटोखाली देण्यात आलं आहे. या फोटोवरुन जयललिता यांच्या एआयडीएमके या पक्षानं श्रीलंकेविरोधात निदर्शनं सुरु केली.

या वादानंतर श्रीलंकेच्या संरक्षण मंत्रालयानं हा फोटो आणि लेख वेबसाईवटरुन हटवला असून खुद्द श्रीलंकेच्या पंतप्रधानांनी माफीही मागितलीय. तामिळींच्या मुद्द्यांवरुन याआधीही श्रीलंका आणि तामिळनाडू असा संघर्ष वेळोवेळी दिसला आहे. त्यामुळं या नव्या फोटोनं आता या वादात आणखी भर घातली आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.