झारखंडच्या बाबा वैद्यनाथ मंदिरात चेंगराचेंगरी, ११ भाविकांचा मृत्यू, ५० जखमी

 झारखंडमधल्या देवघर इथे महादेव मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये अकरा जणांचा मृत्यू झाला आहे. 

Updated: Aug 10, 2015, 05:02 PM IST
झारखंडच्या बाबा वैद्यनाथ मंदिरात चेंगराचेंगरी, ११ भाविकांचा मृत्यू, ५० जखमी title=

देवघर, रांची:  झारखंडमधल्या देवघर इथे महादेव मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये अकरा जणांचा मृत्यू झाला आहे. 

देवघर इथं बाबा बैद्यनाथ धाम सुप्रसिद्ध आहे. श्रावण महिन्यातल्या दुसऱ्या सोमवारच्या निमित्तानं या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. त्यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत अकरा जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. सकाळी पाऊणे सहा वाजताची ही घटना आहे. 

जलाभिषेकासाठी कावडवाले रांगेत उभे असताना काही भाविकांनी रांग तोडून आत घुसण्याचा प्रयत्न केल्यानं धक्काबुक्की झाली. ज्याचं रुपांतर चेंगराचेंगरीत होऊन ११ भाविकांना आपले प्राण गमवावे लागले तर ५० जण जखमी झाले. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.