चेन्नई : पनीरसेल्वम यांच्याशी दोन हात करणाऱ्या शशिकला नटराजन यांच्यासाठी उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. दिवंगत मुख्यमंत्री जयललिता आणि AIADMKच्या विद्यमान महासचिव शशिकला यांच्यावरच्या भ्रष्टाचाराच्या खटल्याचा उद्या सुप्रीम कोर्टात निकाल लागण्याची शक्यता आहे.
उद्याच्या निकालात शशिकला निर्दोष सुटल्या तर त्यांचा मुख्यमंत्रीपदावरचा दावा अधिक घट्ट होईल, मात्र त्या दोषी आढळल्यास तामिळनाडूतल्या नेतृत्वाचा वाद आपोआप मिटेल आणि पनीरसेल्वम यांचा मार्ग प्रशस्त होईल असं मानलं जातंय.