बिहार निवडणुकीच्या तारखा आज जाहीर होण्याची शक्यता

येत्या काही दिवसात बिहारमधल्या विधानसभा निवडणूकीच्या तयारी संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाची आज अत्यंत महत्वाची बैठक सुरू आहे. या बैठकीनंतर आज संध्याकाळीच बिहारच्या निवडणूकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे.

Updated: Sep 9, 2015, 12:16 PM IST
बिहार निवडणुकीच्या तारखा आज जाहीर होण्याची शक्यता title=

नवी दिल्ली : येत्या काही दिवसात बिहारमधल्या विधानसभा निवडणूकीच्या तयारी संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाची आज अत्यंत महत्वाची बैठक सुरू आहे. या बैठकीनंतर आज संध्याकाळीच बिहारच्या निवडणूकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे.

बिहारमधल्या निवडणुका पाच टप्प्यांत होतील, अशी माहिती मिळतेय. त्यात नवरात्र आणि दिवाळी आल्यामुळे या निवडणुकांचे टप्पे वाढवण्यात येणार असल्याचं म्हटलं जातंय. बिहारमध्ये नीतिशकुमार, लालूयादव आणि काँग्रेसनं केलेली महाआघडी आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात लढणारी भाजप यांच्यात थेट टक्कर होणार आहे. मोदी सत्तेत आल्याला आता दीड वर्ष पूर्ण होतंय. त्या पार्श्वभूमीवर बिहारमधला विजय मोदींसाठी महत्वाचा आहे. 

बिहार विधानसभेच्या सद्यस्थितीवर एक नजर... 
एकूण जागा - 243
जेडीयू  - 110
भाजप – 86
राजद – 24
काँग्रेस – 5
इतर + रिक्त – 17

बिहार 2014 लोकसभा निवडणुकीच्या स्थितीवर एक नजर... 
एकूण – 40 जागा
भाजप – 22
एलजेपी – 6
राजद  - 4
आरएलएसपी – 3
इतर  - 5

बिहार लोकसभा निवडणूक 2014 मध्ये प्रत्येक पक्षाला मिळालेल्या मतांच्या टक्केवारीवर एक नजर... 
काँग्रेस – 8.4 टक्के
एलजेपी - 6.4 टक्के
आयएनडी – 4.3 टक्के

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.