मुंबई : (जयवंत पाटील, झी 24 तास) आकाशातून थेट माशांचा पाऊस पडला, ही बातमी वाचून सर्वांनाच वाटतंय, काहीही काय कसं शक्य आहे, आकाशातून गारा पडतात, तसे मासे पडतात.
काहीही हं ... असंच तुम्हालाही वाटतंय ना. पण आकाशातून गारा पडतात तसे मासेही पडतात, आणि कुणी काहीही बोलत असलं तरी ही बातमी आहे, म्हणून आम्हाला ही बातमी तुम्हाला द्यावीच लागेल.
आंध्र प्रदेशात शुक्रवारी 19 जून 2015 रोजी गोल्लामुडी गावात आकाशातून मासे पडले, तेही पावसासारखे, म्हणून याला माशांचा पाऊस म्हटलं गेलं, चार-पाच इंचाचे मासे आकाशातून पडले, माशांचा हा सडा जमीनीवर पडला, रस्ते भरले, तेव्हा अनेक जण चक्रावले.
पण अॅनिमेशन फिल्ममध्ये दाखवतात तसा सुपर नॅचरल एलिमेंट असलेले हे मासे नव्हते, ते आपले साधे मासेच होते. पण हे झालं कसं, पण जगभरात मागील अनेक शतकांमध्ये अशा घटना घडल्या आहेत.
अशा प्रकारच्या पावसात मासेचं नाही, बेडूक, टोमॅटो, कोळशाचे तुकडे एवढंच काय शीडबोटही येऊन पडलीय.
हा एकूण प्रकार अजून पूर्णपणे स्पष्ट झालेला नाही, मात्र काही संशोधकांच्या मते, तसेच आतापर्यंतच्या संशोधनानुसार, समुद्रात जेव्हा ताशी 321 किलोमीटर वेगाने वारे वाहतात, तेव्हा त्या वादळात उंचच उंच गोल-गोल जलस्तंभ तयार होतात.
या जलस्तंभाच्या माध्यमातून छोट मासे, बेडूक, छोट जलचर पाण्यातून हवेने वर फेकले जातात, जेव्हा ही परिस्थिती सामान्य होते, तेव्हा समुद्राच्या कडेला असणाऱ्या गावांमध्ये ते फेकले जातात.
पाहा : आकाशातून मासे कसे पडतात हे सांगणारा व्हिडीओ
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.