मुंबई : आजपासून देशाभरातल्या सर्व सराफ संघटना तीन दिवस संपावर गेल्या आहेत. त्यामुळे देशातले सोन्या-चांदीचे व्यवहार बंद पडणार आहेत.
अर्थमंत्री अरूण जेटलींनी उत्पादन शुल्कात एक टक्का वाढीचा प्रस्ताव अर्थसंकल्पात ठेवलाय. त्याविरोधात देशभरातल्या ३०० संघटनांनी हा बंद पुकारलाय.
एकट्या मुंबईत दररोज सुमारे अडीचशे कोटींचे सोन-चांदीचे व्यवहार होतात. मुंबई आणि परिसरातील सुमारे ३० हजार छोटे मोठे सराफ या बंदमध्ये सामील होत आहेत. उत्पादन शुल्कवाढी व्यतिरिक्त २ लाखांवरच्या खरेदसाठी पॅनकार्डची सक्ती, आयात शुल्कात पाच टक्के वाढ या निर्णयांनाही सराफ व्यापाऱ्यांचा विरोध आहे.