www.24taas.com, नवी दिल्ली
एलबीटीविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलेल्या व्यापाऱ्यांना सुप्रीम कोर्टानं दणका दिलाय. सुप्रीम कोर्टानं एलबीटीविरोधात दाखल केलेल्या सर्वच्या सर्व याचिका फेटाळून लावल्यात.
व्यापाऱ्यांना सध्या तरी एलबीटी भरावाच लागेल, अशी भूमिका सुप्रीम कोर्टानं मांडलीये. कोर्टाच्या या निर्णयानं राज्य सरकारला दिलासा मिळालाय. तर एलबीटीवर ठाम असलेल्या परंतू या निर्णयामुळे एकाकी पडलेल्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा एकप्रकारे विजयच झालाय.
पुणे ट्रेडर्स असोसिएशन आणि इतर व्यापारी संघटनांनी एलबीटीविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकांवर सुप्रीम कोर्टात शुक्रवारी ही सुनावणी पार पडली. सुप्रीम कोर्टानं व्यापारी आणि राज्य सरकार या दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतल्यानंतर व्यापाऱ्यांनी एलबीटी भरावा, असा निर्णय दिलाय.