कोच्ची: फेसबुकवर ‘सेक्सिजम’ बळी ठरलेली केरळची आयपीएस अधिकारी मरीन जोसेफनं आपलं फेसबुक पेज डिलीट केलंय. चर्चेत आल्यानंतर फेसबुकवर मरीनच्या नावानं अनेक खोटे फेसबुक पेज तयार झाले होते, जे थोड्याच वेळात अनेकांनी लाइक्स केले.
हैदराबादमध्ये ट्रेनिंग घेत असलेल्या मरीनला कोच्चीची नवीन एसीपी असं सांगून तिचा फोटो फेसबुकवर पोस्ट केला गेला. हा फोटो अवघ्या काही मिनीटांमध्येच वायरल झाला आणि लोकं त्यावर तुटून पडले. याच दरम्यान, इतकी सुंदर एसीपीच्या हातून आम्हाला अटक व्हायला आवडेल, अशा प्रकारच्या कमेंट्स पडल्या. मरीननं आपण एसीपी नसून ट्रेनी आहे, हे सांगितल्यानंतरही मॅसेजचा पाऊस पडतच राहिला. अखेर मरीननं आपलं फेसबुक पेज डिलीट केलं.
११-१२ सप्टेंबरदरम्यान फेसबुकवर मरीनला ‘पब्लिक फिगर’ सांगून तिच्या नावे कमीत कमी तीन पेज तयार केले गेले. ११ सप्टेंबरला तयार झालेल्या या पेजला १४ सप्टेंबरच्या दुपारपर्यंत ४१ हजारहून अधिक लाइक्स होते. तर आणखी एका पेजला १३ हजारांहून अधिक यूजर्सनी लाइक केलं होतं.
मरीननं २०१२मध्ये पहिल्याच प्रयत्नात यूपीएससीची परीक्षा पास केली होती. तिनं दिल्लीतील स्टीफंस कॉलेजमधून पदवी घेतली. सध्या केरळच्या कॅडरमध्ये दोन मल्याळी आयपीएस अधिकारी आहेत – आर. श्रीलेखा आणि बी. संध्या...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.