मुंबई : पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटांवर बंदी घातल्यानंतर सरकारनं पाचशे आणि दोन हजारांच्या नव्या नोटा प्रसिद्ध केल्या. यातल्या दोन हजार रुपयांच्या नोटेमध्ये प्रिंटिंग मिस्टेक असल्याचा दावा सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे.
भारतीय नोटांवर मागच्या बाजूला 15 भाषांमध्ये छापण्याची परंपरा आहे. या नोटेवर हिंदीमध्ये दो हजार रूपया छापण्याऐवजी 'दोन हजार रूपया' छापलं आहे. ही चूक असल्याचा मेसेज व्हायरल झाला होता. पण 'दोन हजार रूपया' हे हिंदी भाषेतलं नसून कोंकणी भाषेतलं आहे.
दोन हजार रुपयांच्या नोटेच्या डाव्या बाजूला हिंदीमध्ये 'दो हजार रुपया' हे हिंदीमध्ये लिहिण्यात आलं आहे. यामुळे अशा अफवा आणि असे मेसेज फॉरवर्ड करताना प्रत्येकानं आपल्याकडून खोटी माहिती पसरणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.