सेक्स रॅकेट प्रकरणी अभिनेत्रीला अटक

गोवा पोलिसांनी एका टेलिव्हिजन अभिनेत्रीला सेक्स रॅकेट प्रकरणी  अटक केली. अनेक चित्रपटांशी आणि मालिकांशी जोडलेल्या या अभिनेत्रीचा देहव्यापाराशी संबंध असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. 

Updated: Aug 9, 2016, 11:33 PM IST
सेक्स रॅकेट प्रकरणी अभिनेत्रीला अटक title=

गोवा : गोवा पोलिसांनी एका टेलिव्हिजन अभिनेत्रीला सेक्स रॅकेट प्रकरणी  अटक केली. अनेक चित्रपटांशी आणि मालिकांशी जोडलेल्या या अभिनेत्रीचा देहव्यापाराशी संबंध असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. 

स्पॉट बॉय या इंग्रजी संकेतस्थळानुसार अभिनेत्रीने कमी वेळात जास्त पैसे कमविण्यासाठी असे पाऊल उचलले. काही आठवड्यांपूर्वीच ती गुपचूप गोव्यालाही गेली होती. पण पैसे कमविण्याच्या या शॉर्टकटमध्ये ती यशस्वी झाली नाही. 

एका प्रसिद्ध थ्रिलर सिरीजमध्ये करते काम...

सध्या ही अभिनेत्री एका प्रसिद्ध थ्रिलर सिरीजमध्ये काम करतेय.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी तिला अटक केली तेव्हा त्यांनी ही अभिनेत्री असल्याचे माहिती नव्हते, आपण अभिनेत्री असल्याचे सिद्ध करण्यासाठी तिला खूप प्रयत्न करावा लागला. 

मोबाईलमध्ये दाखवले पोलिसांना मालिकांचे सीन

 तिने आपल्या मोबाइलमधील काही चित्रपट आणि मालिकांची दृश्ये दाखविल्यानंतर पोलिसांना ती खरं बोलत असल्याचा विश्वास पटला. चौकशीनंतर पोलिसांनी तिची सुटका केल्यावर ती लगेच मुंबईला परतली.