www.24taas.com, झी मीडिया, चेन्नई
चेन्नईत मध्य रेल्वेच्या स्थानकावर दोन स्फोट झाले आहेत. यामध्ये किमात एक ठार तर दहा जण जखमी झालेत. दक्षिण रेल्वेचे महाव्यवस्थापक आर.के. मिश्रा यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या स्फोटात एक महिला ठार झाली. तपासासाठी श्वान पथक बोलविण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी गाडीमध्येच लपून बसलेल्या एका संशयीताला अटक करण्यात आले असून हा दहशतवादी हल्ला असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
गुवाहाटी एक्सप्रेसमध्ये दोन स्फोट झालेत. या स्फोटात अनेक जण जखमी झालेत. गुवाहाटी एक्सप्रेसमधील एस 4 आणि एस 5 या दोन बोगीत स्फोट झाला. सकाळी 7.5 वाजता गुवाहाटी एक्स्प्रेस स्थानकात आली. ही गाडी फलाट क्रमांक 9 वर उभी असताना 7.15 वाजताच्या सुमारास गाडीच्या एस-4 आणि एस-5 या बोगींमध्ये दोन भयंकर स्फोट घडले. या स्फोटांमध्ये गुंटूरमधील स्वाती नावाची 22 वर्षीय तरुणी जागीच ठार झाली तर 10 प्रवासी गंभीररीत्या जखमी झाले.
मूळची गुंटूर येथील असलेल्या स्वाती या तरूणीचा स्फोटात मृत्यू झाला असून, ती आपल्या कुटुंबासोबत बंगळुरू ते विजयवाडा असा प्रवास करत होती. स्वातीच्या सीटच्या खाली हा एका स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. मृत तरुणी स्वाती हिच्या कुटुंबियांना एक लाखाची तर जखमींना 25 हजार रुपयांची नुकनास भरपाई रेल्वेकडून जाहीर करण्यात आली आहे.
दरम्यान, चेन्नई रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला असून, सुरक्षा चाचणीनंतर साडेदहाच्या सुमारास एक्स्प्रेस पुढील प्रवासासाठी निघणार असल्याची माहिती पोलिसांतर्फे देण्यात आली आहे.
मदतीसाठी दूरध्वनी क्रमांक - 04425357398
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.