जाधवांच्या शिक्षेच्या स्थगितीनंतर ट्विटरवर प्रतिक्रियांचा पाऊस

भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना पाकिस्ताननं सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयानं स्थगिती दिलीय. हेग स्थित आंतरराष्ट्रीय न्यायालयानं अंतिम निकाल येईपर्यंत कुलभूषण जाधव यांना फाशी होणार नाही, याची जबाबदारी पाकनं घ्यावी, असा सज्जड दम दिलाय. 

Updated: May 18, 2017, 04:55 PM IST
जाधवांच्या शिक्षेच्या स्थगितीनंतर ट्विटरवर प्रतिक्रियांचा पाऊस title=

मुंबई : भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना पाकिस्ताननं सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयानं स्थगिती दिलीय. हेग स्थित आंतरराष्ट्रीय न्यायालयानं अंतिम निकाल येईपर्यंत कुलभूषण जाधव यांना फाशी होणार नाही, याची जबाबदारी पाकनं घ्यावी, असा सज्जड दम दिलाय. 

भारताच्या या ऐतिहासिक विजयावर ट्विटरवर प्रतिक्रियांचा पाऊस न पडला तरच नवल... परदेशमंत्री सुषमा स्वराज यांनी, ICJ चा आदेश कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबियांसाठी आणि भारतीयांसाठी दिलासादायक ठरल्याचं म्हटलंय. तर जाधव यांच्या मित्रमंडळींनी, जाधव यांना फाशी होणार नाही, याचा आम्हाला विश्वास होता असं म्हटलंय. 

भारतीय क्रिकेटर वीरेंद्र सेहवागनं केवळ 'सत्यमेव जयते' असं म्हणत आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीय. तर मोहम्मद कैफनं 'भारताला शुभेच्छा आणि ICJ चे आभार' असं म्हटलंय.