जनतेचा छळ थांबवा, उद्धव ठाकरेंचा अरुण जेटलींना फोन

काळ्या पैशांविरुद्धच्या लढाईला शिवसेनेचा पाठिंबा आहे, पण सध्या सुरु असलेला जनतेचा छळ थांबवा असं आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी अर्थमंत्री अरुण जेटलींना केलं आहे.

Updated: Nov 13, 2016, 06:59 PM IST
जनतेचा छळ थांबवा, उद्धव ठाकरेंचा अरुण जेटलींना फोन title=

मुंबई : काळ्या पैशांविरुद्धच्या लढाईला शिवसेनेचा पाठिंबा आहे, पण सध्या सुरु असलेला जनतेचा छळ थांबवा असं आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी अर्थमंत्री अरुण जेटलींना केलं आहे. अरुण जेटली आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये फोनवर चर्चा झाली आहे.

काळा पैसावाल्यांना चाप बसायलाच पाहिजे, त्यासाठी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत आहे, पण जुन्या-नव्या नोटांच्या अदलाबदलीत सामान्य जनतेचे नुकसान होता कामा नये, याची काळजी घेणं गरजेचं असल्याचंही उद्धव ठाकरेंनी अरुण जेटलींना सांगितलं.

पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा वापरण्यासाठी 30 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ द्यावी अशी मागणी शिवसेनेनं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे केली आहे.